मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेचे (Rajya Sabha) व्हीप म्हणून नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे. तर राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी राज्यसभेत काँग्रेसचे आनंद शर्मा हे उपनेते पद होते. तर राज्यसभा गटनेते पदी मल्लिकार्जुन खरगे हे तूर्तास कायम आहेत. जयराम रमेश यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेते पद आणि रजनी पाटील यांची राज्यसभेचे व्हिप म्हणून नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली असून राज्यसभा अध्यक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.”
Chairperson of the Congress Parliamentary Party, Smt. Sonia Gandhi, has approved the appointments of Shri Pramod Tiwari as Deputy Leader & Smt. Rajani Patil as Whip of the Congress Party in the Rajya Sabha. The Chairman of the Rajya Sabha has been informed of these appointments.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) March 11, 2023
रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण संपन्न झाले होते. पंतप्रधनांच्या भाषणादरम्यान विरोधक हे गदारोळ आणि घोषणा देत होते. आणि या गदारोळाचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर भाजपने केला होता. या पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सभापतीनी दिले होते. रजनी पाटील यांच्यावर एका अधिवेशनापुरते निलंबनाची कारवाई करण्यात आली.
संबंधित बातम्या
रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.