HW News Marathi
देश / विदेश

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

नवी दिल्ली | कर्नाटकाच्या धर्तीवर आता भाजप मध्यप्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस राबवित आहेत. काँग्रेसचे आणि अपक्ष असे मिळून एकूण ८ आमदार काल (३ मार्च) हरयाणातील गुरुग्राम इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याची माहिती भोपालमधील स्थानिक वर्मानपत्राने दिली. यानुसार मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान काल सायंकाळी उशिरा दिल्लीत दाखल झाले होते.

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजप नेते नरोत्तम मिश्र हे काँग्रेसच्या कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५ ते ३५ कोटींची लालूच दाखवत आहे, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे. या आमदारांची भेट घेण्यासाठी जेव्हा उच्च शिक्षण मंत्री जितू पटवारी आणि मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री जयवर्धन सिंह हे कमलनाथ सरकारमधील मंत्री पोहोचले तेव्हा त्यांना भेट नाकारण्यात आली. या आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी हरयाणाचे पोलीस तैनात करण्यात आले होते. अखेर भानोट स्वत: या आमदारांची भेट घेण्यासाठी हॉटेलवर गेले.

या प्रकरणावर मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्वीट हँडलवर माहिती दिली की, मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारला घाबरण्याच गरज नसल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ केले आहे. कमलनाथ म्हणाले की, आमच्या सरकारला कोणतीही भिती नाही ना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. भाजपने लक्ष्यात ठेवले पाहिजे की, आमचे लोकतंत्र भाजपच्या धनबलपेक्षा जास्त मजबूत आहे, असा धमकी वजा इशारा कमलनाथ यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशाच्या विधानसभेचे असे आहे संख्याबळ

मध्य प्रदेशात एकूण २३० आमदार असून त्यातील ११४ आमदार काँग्रेसकडे आहेत. भाजपकडे १०७ आमदार आहेत. तर उरलेले ९ आमदार हे बसपा, समाजवादी पक्ष आणि अपक्ष आहेत. मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांची संख्या ही ११६ आहे. काँग्रेसने १२१ आमदारांची संख्या दाखवत सत्ता स्थापन केली होती.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

News Desk

“लवकरच ठाकरे सरकार कोसळणार…”, अमित शहांचे मोठे विधान

News Desk

येडियुरप्पा २४ तासांचे मुख्यमंत्री?

News Desk