HW Marathi
देश / विदेश

भाजप निवडणुकीपूर्वी नीरव मोदीला भारतात आणले, यानंतर पुन्हा परदेशात पाठवणार | काँग्रेस

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनमध्ये आज (२० मार्च) अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी नीरव मोदीला भारतात आणेल आणि निवडणूक संपली की, परदेशात पाठवले, अशी भाजपवर टीका केली आहे.

“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नीरव मोदीला अटक केले असून निवडणुकीता याचा फायदा घेणार आहे. यानंतर निवडणुका झाल्यानंतर नीरव मोदीला पुन्हा परदेशात पाठवणार आहे,” असा आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर आता लंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने जुलै-ऑगस्टमध्ये नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली होती.

Related posts

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

पूनम कुलकर्णी

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

News Desk