मुंबई। पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची आज दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून मुसेवाला यांच्यावर पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली. मुसेवाला हे आज (२९ मे) त्यांच्या मित्रांसोबत मानसा येथील त्यांच्या निवासस्थानी जाणार होते. त्यामुळे अज्ञातांनी मुसेवाला यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मुसेवाला यांची मृत्यू झाला.
Punjabi singer Sidhu Moose Wala was shot by unknown people in Mansa district, Punjab. Further details awaited. pic.twitter.com/DiK5s6UCvv
— ANI (@ANI) May 29, 2022
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल (२८ मे) ४२४ जणांची सुरक्षा काढली होती. राज्य सरकारने सुरक्षा काढून एक वर्ष देखील उलटला नाही तोपर्यंत मुसेवाला यांची हत्या झाली. दरम्यान, नुकतेच पंजाब विधानसभा निवडणुका पार पडली. या निवडणुकीत मुसेवाला यांना काँग्रेसने मानसा जिल्ह्यातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत आपचे उमेदवार डाॅ. विजय सिंघला यांनी मुसेवाला यांचा पराभव केला होता.
मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत म्हणाले, “सिद्ध मुसेवाला यांच्या हत्या झाल्याची माहिती मिळताच मला मोठा धक्का बसला आहे. मुसेवाला यांच्या हत्येत ज्यांचा सहभाग असेल त्यांना आम्ही सोडणार नाही. मुसेवाला यांच्या कुटुंब आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन करतोय,” असे ते म्हटले.
“I am Shocked and Deeply saddened by the gruesome murder of Siddhu Moosewala. Nobody involved will be spared. My thoughts and prayers are with his family and his fans across the world. I appeal everyone to stay calm,” tweets Punjab CM Bhagwant Mann
(File Pic) pic.twitter.com/ULuOpi0dDl
— ANI (@ANI) May 29, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.