HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत राष्ट्रपती भवनापर्यंत कॉंग्रेसचा मार्च, शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

नवी दिल्ली | दिल्लीत गेले अनेक दिवस शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. आज (२४ डिसेंबर) कॉंग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे मार्च काढण्यात आला आहे. या मार्चमध्ये राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्याही समावेश आहे. दरम्यान, हा मार्च काढण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मार्च सुरुच आहे. काही वेळात राहूल गांधी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांच्याकडे २ कोटी शेतकऱ्यांच्या सहीचे पत्र देणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींना ३ लोकांनीच भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हा मुद्दा आणखी नवे कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी पक्षाने देशभरातील शेतकऱ्यांच्या सह्या गोळा केल्या आहेत.२६ नोव्हेंबरपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवरील शेती कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. हे कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत, परंतु अद्याप तो प्रश्न सुटलेला नाही. सरकार आणि शेतकरी यांच्यात पुढची चर्चा काही दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी निषेध करणार्‍या शेतकर्‍यांना एक खुले पत्र लिहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व अन्नदात्यांना ते वाचण्याची विनंती केली होती. “कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विनम्र संवाद साधण्याचा प्रयत्न करीत शेतकरी बांधवांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्व अन्नदात्यांना ते वाचण्याची विनंती मी करतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहचवावे, असेही मी देशवासियांना आवाहन करतो” असे पंतप्रधान मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

swarit

कृषी कायदा रद्द होणार नाही अमित शाहांनी केले स्पष्ट, तर आजची होणारी बैठकही रद्द

News Desk

कुलभूषण जाधव दोषी, कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार !

News Desk