HW Marathi
देश / विदेश राजकारण

‘रेप इन इंडिया’ व्यक्तव्यावर माफी मागणार नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका

नवी दिल्ली | “‘मेक इन इंडिया नाही’ तर ‘रेप इन इंडिया’, या माझ्या वक्तव्यावर मी माफी मागणार नाही,” अशी ठाम भूमिका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना घेतली. “नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणाले होते, त्यांची क्लिप माझ्याकडे आहे, याची आठवण देखील राहुल गांधींनी करुन दिली होती. ती क्लिप मी ट्वीट करेन, तेव्हा संपूर्ण देश ती पाहू शकतो,” असे म्हणत राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “आज महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, नरेंद्र मोदी, भाजप आणि अमित शहांनी ईशान्यकडील राज्ये पेटविली आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्यावर हे आरोप करत असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.”

राहुला गांधी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतील प्रचार रॅलीदरम्यान नेमके काय म्हटले त्यांनी ते माध्यमांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, “ नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘मेक इन इंडिया’ होणार, आपण विचार केला की वर्तमान पत्रात ‘मेक इन इंडिया’ बद्दल आपल्याल वाचायला मिळणार, पण आज जेव्हा आपण वर्तमान पत्र उघडतो तेव्हा पाहतो की, आपल्याला सर्व ठिकाणी रेप इन इंडिया पाहायला मिळते. देशातील असे एकही राज्य नाही, जेथे भाजपचे सरकार नाही. त्या राज्यात महिलांवर अन्याय होत नाही. तसेच उन्नावमध्ये भाजपच्या आमदारांनी महिलेवर बलात्कार केला. तिच्या गाडीचा अपघात घडविला, त्यावेळी मोदींनी मौन बाळगले होते.” पण “त्या आमदारावर कारवाई देखील केली नाही. नरेंद्र मोदी हे हिंसाचाराचा वापर करतात. हिंसाचार पसरवितात. आणि महिलांवर हिंसा होत आहे, त्याचबरोबर ईशान्यकडील राज्यांवर हिंसा होत आहे. काश्मीरमध्ये हिंसा आहे. संपूर्ण देशात हिंसा होत आहे.”

देशाच्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींचे मोदींना प्रश्न  

राहुल गांधी पुढे असे देखील म्हणाले की, “आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन गेल्या काही दिवसांन पूर्ण मला भेटले त्यांनी मला सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये भारताबद्दल बोलने होत नाही. जेव्हा आपल्या देशाबद्दल बोलेले जाते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलणे होत नाही, तर अत्याचार आणि हिंसा यावर बोले जाते. जी आपल्या देशाची प्रतिष्ठा होती. ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे. या सर्व गोष्टी मी काल माझ्या झारखंडमध्ये प्रचार सभेत म्हटले. नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट का केली,”  देशातील तरूणांकडे रोजगार होता, मात्र, नरेंद्र मोदींनी त्यांचा रोजगार का?, हिरावून घेतला असे अनेक प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावे,” असे राहुल गांधींनी मोदींनी प्रश्न विचारले.

 

Related posts

अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली !

News Desk

#AyodhyaVerdict : न्यायालयाचा निर्णय कुणाची जीत अथवा हार नसेल, शांतता राखण्याचे आवाहन

News Desk

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk