HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन; यात्रा तात्पुरती स्थगित

मुंबई | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे निधन झाले आहे. यात्रेदरम्यान संतोख सिंह यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले. यानंतर संतोख सिंह यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरोरांनी संतोख सिंह यांना मृत घोषित केले.

भारत जोडो यात्रेदरम्यान संतोख सिंह चौधरी यांच्या निधनाची बामतीनंतर काँग्रेस नेते गुरजित सिंह आणि विजय इंदर सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. संतोख सिंह चौधरी हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत फिल्लोर मधील यात्रेदरम्यान सहभागी झाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. संतोख सिंह चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा ही पंजाबमधील फिल्लोरमध्ये तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते हे संतोख सिंह चौधरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली.

संतोख सिंह चौधरी यांचा अल्प परिचय

संतोख सिंह चौधरी हे पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार असताना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले होते. संतोख सिंह चौधरी हे 2014 आणि 2019 च्या लोकासभा निवडणुकीत विजय मिळाला होता. पंजाबमंध्ये संतोख सिंह चौधरी हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनी 2004 ते 2010 या कालावधीत पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहिले होते. तर काँग्रेकडून 2002मध्ये संतोख सिंह चौधरी यांना फिल्लोर विधानसभेचे तिकीट दिले होते आणि या जागेवर ते विजयी देखील झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

swarit

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटला मायदेशी पाठवण्याची जोरदार मागणी

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात केले दाखल

News Desk