HW Marathi
देश / विदेश राजकारण

#DelhiAssemblyElections Live Updates : गांधी कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेा निवडणुकीसाठी आज (८ फेब्रुवारी) ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजपा आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या.

Live Updates

 

  • काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशचा महासचिव प्रियांका गांधी यांनी मजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मतदानाचा हक्क बजावला

  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले मतदान, यावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्लीकरांना आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. महत्त्वाचे महिलांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याचे आव्हान केजरीवाल यांनी दिल्लीकरांना केले आहे.
  • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

  • बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिनं बजावला मतदानाचा हक्क
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दिल्ली विधानसभा निवडणुकी म्हटले की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आहे. सर्व मतदारांना आवाहन आहे की, अधिक संख्येने मतदान करा आणि नवी विक्रम प्रस्थापित करा.”
  • दिल्लीत सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.

Related posts

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री

News Desk

संघाकडून शिकण्यासारखे असे काहीही नाही !

News Desk