HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदनाचे ट्विटर अकाऊंट डिलीट

मुंबई | निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांचे राजीनाम सत्र सुरुच आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी पराभवानंतर राजीनामे सादर केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना एक महिन्या मीडियामधील कोणत्याही डिबेटमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे. यात काँग्रेसच्या सोशल मीडिया विंगच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्वीटरला रामराम केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दिव्या स्पंदना यांच्या ट्विटर हॅण्डलवर कोणत्याही प्रकारची ट्विट दिसत नसून त्यांच्या प्रोफाईलवरील माहिती सुद्धा गायब झाली आहे.

तसेच स्पंदना ट्विटरवर दिसू आल्या नाहीत. त्यांनी अकाऊंट डिलीट केले आहे. त्यामुळे स्पंदना यांनी काँग्रेसचे सोशल मीडिया विंग प्रमुख पद सोडून दिले का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या सर्व प्रकरणावर काँग्रेसच्या माध्यम विभागाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. भाजपच्या सोशल मीडियातील पूर्ण ताकदींशी उत्तर देऊन काँग्रेसला सोशल मीडियावर मजबूत करण्याचे श्रेय दिव्या स्पंदना यांना दिले जाते आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐकावे ते नवलच ! आंध्र प्रदेशात ५ उपमुख्यमंत्री

News Desk

लाल किल्ल्यात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा

News Desk

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

News Desk