HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसकडून राजस्थानच्या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी, ॲाडिओ क्लिप वायरल झाल्याने कारवाई

राजस्थान | राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी राजस्थान सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप नेते संजय जैन आणि कॉंग्रेसचे आमदार भंवर लाल शर्मा यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ टेपबाबत त्यांनी अनेक खुलासे केले. वायरल ऑडिया क्लिप नंतर काॅंग्रेस पक्षाने सचिन पायलट यांचे समर्थक असलेल्या दोन आमदारांचं पक्षाचं सदस्यत्व रद्द केले आहे. आमदार भंवरलाल शर्मा आणि माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, राजस्थानमधील सध्या सुरू असलेली राजकीय लढाई आता कोर्टाच्या दारात पोहोचली आहे.

सचिन पायलट यांच्यासह त्यांच्यासह त्यांच्या १९ आमदारांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणी होण्यापूर्वी आज मुख्यमंत्री अशोक गहलोत पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 19 समर्थक आमदारांना विधानसभेच्या सभापतींची नोटीस देण्याची बाब गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. पायलट यांच्यासह आमदारांनी राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रतेच्या नोटीसला हायकोर्टात आव्हान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण… शरद पवार

News Desk

सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे’ – अरुण जेटली

News Desk

बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल – संजय राऊत

News Desk