नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या दिवसात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ डिसेंबर) रामलीला मैदानावरून विरोधकांवर तोफ डागली. “देशातील मुस्लिमांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवले जाईल नागरिकत्व कायदा आणि एनआरसीसंदर्भात शिकलेले अर्बन नक्षलवादी आणि काँग्रेस जे सांगतात ते सरळ सरळ अफवा असल्याचे त्यांनी सांगतिले.” दरम्यान, मोदी पुढे म्हणाले की, “नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा, कोणाचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे. मोदी म्हणाले की, या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवे आयुष्य मिळेल.”
#WATCH PM Narendra Modi, in Delhi: Congress and its friends, some urban naxals are spreading rumours that all Muslims will be sent to detention centres…Respect your education, read what is Citizenship Amendment Act and NRC. You are educated. pic.twitter.com/30kQc7pdhO
— ANI (@ANI) December 22, 2019
मोदी म्हणाले की, “मी देशातील तरुणांना आग्रह करतो की त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी हा कायदा नेमका काय आहे. ते समजून घ्या, त्या कायद्याबद्दल वाचून घ्या, काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील मोदींनी आंदोलनकाऱ्यांना केले आहे.
मैं इन लोगों को कहना चाहता हूं कि मोदी को देश की जनता ने बैठाया, ये अगर आपको पसंद नहीं है, तो आप मोदी को गाली दो, मोदी का विरोध करो, मोदी का पुतला जलाओ।
लेकिन देश की संपत्ति मत जलाओ, गरीब की ऑटो रिक्शा मत जलाओ, गरीब की झोपड़ी मत जलाओ: पीएम मोदी #DilliChaleModiKeSaath pic.twitter.com/ot5BGiSLqP
— BJP (@BJP4India) December 22, 2019
“माझ्या पुतळ्याला जोडे मारा, मला हव्या तितक्या शिव्या द्या, पण शाकीय मालमत्तेची हानी आणि गोरगरिबांच्या वाहने जाळून नुकसान करु नका. असे करुन तुम्हाला काय मिळणार आहे? असा भावनिक प्रश्न मोदींनी विचारला. देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांवर, हिंसाचारावर बोलताना मोदींनी देशभरातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.