HW News Marathi
देश / विदेश

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

मुंबई | दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संविधान निर्माते डॉ भीमराव आंबेडकर यांचे स्मरण केेले जाते. यूजीसीने देशामधील सर्व विद्यापीठांना २६ नोव्हेंबर ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.

जगातील सर्वात मोठे संविधान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. त्यांनी भारतीय संविधानाच्या रुपात जगातील सर्वात मोठे संविधान लिहले आहे. जगातील सर्व संविधानांचा अभ्यास करुन हे संविधान लिहण्यात आले आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे जिच्यामध्ये ४४८ अनुच्छेद, १२ अनुसूची आणि ९४ दुरुस्त्या आहेत. हे एक हस्तलिखित संविधान असून त्यात ४८ आर्टिकल आहेत. हे लिहण्यासाठी २ वर्षे लागली ११ महिने आणि १७ दिवस लागले होते.

२६ नोव्हेंबर रोजी असतो संविधान दिवस

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेच्या वतीने २६ नोव्हेंबर १९५० रोजी स्वीकारण्यात आले. तसेच १९५० रोजी ते संविधान लोकशाही प्रणालीने स्वीकारण्यात आले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात या संविधानाटा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीचे

अध्यक्ष म्हणून डॉ. भीमराव अंबेडकर यांची निवड करण्यात आली होती.

संविधानाचा हा मसुदा तयार करणा-या या समितीने हे संविधान हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत लिहून ठेवले. यात कोणत्याही प्रकारच्या टाइपिंग किंवा प्रिंटचा वापर केलेला नाही. संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी यांवर स्वाक्ष-या केल्या आणि त्यानंतर दोन दिवसांनी हे संविधान लागू करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून बंदची हाक, सरकारी बसेसची तोडफोड

swarit

आज राज्यसभेत सादर होणार ‘तीन तलाक’ विधेयक

swarit

श्रीनगरमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, संतप्त जमावाकडून दगडफेक

News Desk