HW News Marathi
Covid-19

कोरोना १०० वर्षातील सर्वात मोठे संकट – शक्तिकांत दास

नवी दिल्ली | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे.कोरोना हे १०० वर्षांतील सर्वात मोठे संकट, पण आता आर्थिक सुधारणा दिसू लागल्या आहेत, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले आहेत. आज (११ जुलै) ७व्या एसबीआय बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी संबोधित केलं आहे. कोरोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट आहे, तरीही चांगली गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. देशातील आर्थिक व्यवहार सामान्य स्थितीत पोहोचले आहेत. परंतु यावेळी बँकांना त्यांच्या जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी काल सांगितले की, कर्जाची परतफेड करण्यासाठी मॉरोरियमवरील बोर्डाच्या विस्ताराची गरज भासणार नाही. अद्यापही काही क्षेत्रांना मदतीची आवश्यकता आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यासंदर्भात योग्य ती पावले उचलेल.

आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले की, कोरोनाशी सामना करण्यासाठी बरीच महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. कठीण काळात अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंत्रणेत Surplus Liquidity राखण्यावर जोर दिला जात आहे. कोरोना संकटाच्या आधीच आरबीआयने बरीच पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. व्याजदरात मोठी कपात केली असून, आर्थिक वाढीची गती वाढविण्यासाठी अधिक पावले उचलण्याची तयारी आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोनामुळे उत्पादन, नोकरी आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. आधीच अस्तित्वात असलेली जागतिक व्यवस्था, जागतिक मूल्य साखळी आणि जगभरातील कामगार आणि भांडवलाच्या हालचालींवर या संकटाचा परिणाम झाला आहे. देशातील प्रत्येक बँकेला त्याच्या ताळेबंदातील कोविड तणाव चाचणी करण्यास सांगितले गेले आहे. सोप्या शब्दांत कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे बँकांना त्यांचा ताळेबंद तपासण्यासाठी आणि त्यांची किती मालमत्ता बुडणार आहे हे सांगण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पूर्ववत होण्याच्या मार्गावर…!

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! मुंबईतील ३०५ इमारती BMCनं केल्या सील

News Desk

राज्यात पहिली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk