HW News Marathi
Covid-19

काँग्रेस नेते राजीव सातव यांची अखेर कोरोनावर मात

पुणे | काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. १९ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता लवकरच राजीव सातव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस राजीव सातव यांचा कोरोना विरुद्धची लढा सुरुच होता.

२३ एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद द्यायला लागले. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सामान्य स्थितीत आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज बैठक

swarit

कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ! जाणून घ्या नवी नियमावली…

News Desk

देशात कोरोना रूग्ण संख्या घटली!

News Desk