HW News Marathi
Covid-19

खुशखबर ! कोरोनावरील लस ‘ या ‘ देशाने केली तयार 

मॉस्को | सध्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक आनंदाची बातमी आहे. जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे.

रशियाचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया १२ ऑगस्टला ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.

रशिया सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, Gam-Covid-Vac Lyo नावाचं हे वॅक्सिन १२ ऑगस्टला रजिस्टर करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये लसीचे मास-प्रोडक्शन सुरु करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर पासून देशभरात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

रशियाने कोरोनावरील या वॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल जवळपास दोन महिन्यांपूर्वी सुरु केली होती. रशियातील रशियातील संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैनिकांनी वॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलमध्ये व्हॉलिंटयर्स म्हणून काम केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

News Desk

दिलासादायक ! राज्यात १४ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

मग महाराष्ट्रात येतानाही आमच्या पोलिसांची परवानगी लागेल !

News Desk