मुंबई | देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या सगळीकडेच मोठे चिंतेचे वातावरण आहे. या कोरोना संसर्गाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर गर्दी टाळणे ही प्राथमिक खबरदारी आपण सध्या घेऊ शकतो. देशातील प्रत्येक राज्याचे सरकार हे सध्या वारंवार आपल्या नागरिकांना गर्दी टाळण्याचेच आवाहन करत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी अनेक शहरांतील अत्यावश्यक सोयीसुविधा वगळता बाकी सर्व कार्यालये, दुकाने, शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी देखील रविवारी (२२ मार्च) संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू केला आहे. मात्र, तरीही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रविवारी सुरूच राहील केवळ शाखांची वेळ बदलण्यात येईल’, अशी माहिती संघाने ट्विटरवरुन दिली आहे.
https://twitter.com/RSSorg/status/1241231556674342912?s=20
रविवारी (२२ मार्च) म्हणजे उद्या सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान संपूर्ण देशभरात ‘जनता कर्फ्यू’ लागू राहणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. त्यामुळे, “रविवारी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरूच राहतील. मात्र, शाखांच्या वेळा बदलण्यात येतील. सकाळी ६.३० पूर्वी आणि रात्री ९.०० नंतर शाखा सुरु राहतील”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले आहे. हे ट्विट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या जनता कर्फ्यूच्या निर्णयाला आता देशातील सर्वसामान्य जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.