HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरात ३८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण

मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. आतापर्यंत जगभरात ३८ लाख १८ हजार ७७९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यापैकी २ लाख ६४ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात १२ लाख ९८ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहे. जगात गेल्या २४ तासांमध्ये ९४ हजार २६१ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६ हजार ७८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेत दिसून येत आहे. अमेरिकेतील रुग्णांच्या एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर अमेरिकेत एक चतुर्थांश कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठा स्पेन जगात दुसऱ्या स्थान आहे. स्पेनमधील २५३,६८२ कोरोनाची लागण झाली असून २५ हजार ८५७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका, स्पेनखालोखाल यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या

  • अमेरिका – एकूण रूग्ण १,२६२, ८७५ एकूण मृत्यू ७४,७९४
  • स्पेन – एकूण रूग्ण २५३,६८२ एकूण मृत्यू २५,८५७
  • इटली – एकूण रूग्ण २१४,४५७ एकूण मृत्यू २९,६८४
  • यूके – एकूण रूग्ण २०१,१०१ एकूण मृत्यू ३०,०७६
  • फ्रान्स – एकूण रूग्ण १७४,१९१ एकूण मृत्यू २५,८०९
  • जर्मनी – एकूण रूग्ण १६८,१६२ एकूण मृत्यू ७,२७५
  • रूस – एकूण रूग्ण १६५,९२९ एकूण मृत्यू १,५३७
  • टर्की – एकूण रूग्ण १३१,७४४, एकूण मृत्यू ३,५८४
  • ब्राझील – एकूण रूग्ण १२६,१४८ एकूण मृत्यू ८,५६६
  • इराण – एकूण रूग्ण १०१,६५० एकूण मृत्यू ६,४१८
  • चीन – एकूण रूग्ण ८२,८८३ एकूण मृत्यू ४,६३३
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! ॲाक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला मिळाली परवानगी !

News Desk

आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांवर

News Desk

आता जास्त वेळ न घालवता केंद्राने मराठा समाजाला न्याय द्यावा ! । मुख्यमंत्र्यांची मागणी

News Desk