मुंबई | आपला संपूर्ण देश सध्या ‘कोरोना’शी लढतो आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. १४ एप्रिलला हा लॉकडाऊन संपणार असल्याने सरकार पुढे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. त्यातच आता तेलंगणा सरकारने मोठी घोषणा केली आहे. १४ तारखेला देशातील लॉकडाऊन संपल्यानंतरही तेलंगणामध्ये पुढच्या आणखी आठवड्यांसाठी लॉकडाऊन जारी राहणार आहे. त्याचप्रमाणे, बीसीजी अहवालाचा दाखल देत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देशातील लॉकडाऊन जून महिन्यापर्यंत कायम राहिले तर देशासाठी ते योग्य ठरेल असे म्हटले आहे.
Telangana Chief Minister's Office now clarifies that CM K Chandrasekhar Rao suggested extension of lockdown for 2 more weeks (after April 15). He took a reference from BCG report which suggested lockdown in India will be good until June 3. No announcement of extension yet. pic.twitter.com/dxLb89RapT
— ANI (@ANI) April 6, 2020
तेलंगणामध्ये मात्र १४ एप्रिलनंतर २ आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जून महिन्यापर्यंतच्या लॉकडाऊनबद्दल बोलताना देखील त्यांनी केवळ बीसीजीच्या अहवालावर आधारित वक्तव्य केले असून कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यांनी केवळ याबद्दल सुचविले असून निर्णय घेतलेला नाही, असे तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेलंगणामध्ये राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३२१ असून कोरोनाग्रस्तांच्या मृतांची संख्या ७ आहे. तर ३४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.