HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | राष्ट्रवादी अन् शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र भाजपही करणार आर्थिक मदत

मुंबई | आपल्या देशात सध्या तासागणिक कोरोना व्हायरसचा आकडा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात एकूण २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर उभ्या ठाकलेल्या अनेक आर्थिक अडचणी लक्षात घेता आता राजकीय वर्तुळातून मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंतर आता भाजप देखील मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सर्वानुमते निर्णय होऊन भाजपचे महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार आपले एका महिन्याचे वेतन ‘भाजप आपदा कोष’मध्ये जमा करणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“कोरोनोसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी जनसामान्यांना मदत करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येईल”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. “राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत”, असा आदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला.

शिवसेनेचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अशीच घोषणा केली “शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत. कोरोना वायरस विरुध्दच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू”,असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. याचसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

Gauri Tilekar

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार यांची नियुक्ती

News Desk

#MeToo : जेव्हा झालं तेव्हाच तोंड का उघडलं नाही ?

News Desk