HW News Marathi
Covid-19

नव्या कोरोना स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस कार्यक्षम, भारत BioTechचा दावा

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. तर मृतांचा आकडाही नकोसा विक्रम करत आहे. भारतात कोरोना फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक आहे. मात्र भारतात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे.

देशातील (B.1.617) आणि ब्रिटनमधील (B.1.1.7) या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचं अभ्यासातून आता समोर आलं आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. त्यानंतर भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

देशात सध्या तीन लशींचं लसीकरण सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूटद्वारे तयार केलेली कोविशील्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन आणि रशियातून आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लशींचा आता नव्याने यात समावेश आहे. आतापर्यंत देशात १८ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील पहिलेच आमदार! निलेश लंकेचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ कडून सन्मान

News Desk

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी, तर आदेश गुप्तांची नियुक्ती

News Desk