HW Marathi
Covid-19 देश / विदेश

कोरोना योद्ध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य, मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली |देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षापासून डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलिस दिवस रात्र मेहनत करत आहेत. या सगळ्या कोव्हिड योद्ध्यांना मोदी सरकारकडून एक गिफ्ट मिळणार आहे.

कोरोनाच्या अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय वैकर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. NEET-PG परीक्षा कमीत कमी ४ महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सतत बैठक घेतायत आणि कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी कठोर निर्णयांची अंमलबजावणीही करतायत. सोमवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. ते म्हणाले की, त्यांच्या विभागाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोविडशी संबंधित कर्तव्य केले पाहिजे.

कोविड रुग्णांच्या सेवेत १०० दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. नुकतेच हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार असून, त्यांची कमतरता भासू शकते. महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.

पंतप्रधान मोदींचे काय आहेत निर्णय
>>वरिष्ठ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोरोना नर्सिंगमध्ये BSc/GNM परिचारिका वापरल्या जाऊ शकतात.
>>ड्युटीवर असणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने लस दिली जाईल. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेल्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच केंद्राच्या विमा योजनेत समाविष्ट केले जाईल.
>>सर्व कोविड योद्धे जे कोरोनाविरुद्ध 100 दिवसांच्या कर्तव्यासाठी तयार असतील आणि ते पूर्ण करतील त्यांना भारत सरकारच्या वतीने पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोरोना राष्ट्रीय सेवा पुरस्कार देखील देण्यात येईल.
>>पीजी विद्यार्थ्यांच्या नवीन बॅच जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत अंतिम वर्षाच्या पीजी विद्यार्थ्यांना सेवेत वापरले जाऊ शकते.

Related posts

सिक्‍कीममधील घुसखोरीचा चीनी सैनिकांचा डाव, भारतीय जवानांनी उधळून लावला कट

News Desk

जाणून घ्या… देशभरातील कोणकोणत्या राज्यात किती रुग्ण ‘कोरोना’मुक्त

अपर्णा गोतपागर

राज्यात आज ८ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk