नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त अगदी थोड्याच वेळापूर्वी समोर येत होते. स्वतः भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आज (९ ऑगस्ट) काहीच वेळापूर्वी ट्विट करून अमित शाह यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. मात्र, आता मनोज तिवारी यांनी आपले हे ट्विटच डिलीट केले आहे. तर दुसरीकडे “अद्याप अमित शहांची कोरोना चाचणीच केलेली नाही”, असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता सांगण्यात आले आहे. त्यामुळे, आता अमित शहा यांच्या कोरोना रिपोर्टबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
#COVID19 test of Home Minister Amit Shah has not been conducted so far: Ministry of Home Affairs (MHA) Official https://t.co/8UaeUtNgBp
— ANI (@ANI) August 9, 2020
भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी एकीकडे स्वतः अमित शाह कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे पूर्णपणे फेटाळण्यात आले आहे. तर मनोज तिवारींनी देखील आता आपले ट्विट डिलीट केल्याने, आता संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, अमित शाह यांना ३ ॲागस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याने स्पष्ट झाले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित शाह यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अमित शाह अयोध्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यास देखील उपस्थित राहू शकले नव्हते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.