HW News Marathi
Covid-19

Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान लसीकरण अभियानाला गती आली आहे. यादरम्यान कोरोना लशीबाबत केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइन्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने लशीच्या दोन डोजमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या गाइडलाइन्सनुसार कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये आता ४ च्या ऐवजी ६ ते ८आठवड्यांचं अंतर असेल.

नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-१९ या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कोविशिल्डचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की, त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना द्याव्यात. जेणेकरून लसीकरणाच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडणार नाही आणि लसीकरणाचा हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल. भारतात आपत्कालीन वापरासाठी दोन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. एक आहे भारत बायोटेकची कोवाक्सिन आहे आणि दुसरी म्हणजे अ‍ॅस्ट्रोजेनिका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड भारतात सुरू असलेल्या लसीकरणात या दोन्ही लस दिल्या जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

ग्रीन-ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून नागरिकांना पाठवू नये, कोरोनाची लोकांच्या मनात भीती !

News Desk

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

News Desk