HW News Marathi
Covid-19

पुण्यात तुर्तास लॉकडाऊन नाही…पण..अजित पवारांनी काय दिला अल्टिमेटम?

पुणे | राज्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. दरम्यान, पुण्यात झपट्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन केला जाणार का असा सवाल नागरिकांना पडला असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे. आज (२६ मार्च) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवारांनी आता पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

आज झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय २ एप्रिलसंदर्भात घेण्यता आला. “लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाचे मुद्दे-

  • आताचा कोरोना वेगाने पसरतोय
  • सामूहिक होळी साजरी करायची नाही
  • लॉकडाऊन झाल्यास गोरगरीबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार
  • जिथे रुग्ण जास्त तिथे लसीचा पुरवठा जास्त व्हावा
  • खासगी केंद्रावर होणाऱ्या कोरोना चाचणीची शहानिशा होणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : ‘वंदे भारत’चा दुसरा टप्पा १६ ते २२ मे असणार

News Desk

“लोक तडफडून मरत असतानाही मोदींना पाझर का फुटत नाही ?”

News Desk

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयानं केंद्राला फटकारलं

News Desk