HW Marathi
देश / विदेश राजकारण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२४, मुंबई-ठाण्यात प्रत्येकी १ नवा रुग्ण

मुंबई | देशासह राज्यात ‘कोरोना’बाधितांचा आकडा तासागणिक वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२२ वरून आता १२४ वर पोहोचला आहे. “बुधवारी (२५ मार्च) संध्याकाळी, मुंबईत १ व ठाण्यात 1 असे २ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत”, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. त्याचप्रमाणे, राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या आता ४ झाली आहे. वाशीतील एका महिलेचा आज (२६ मार्च) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील वाढत जाणारा आकडा हा आता सरकारच्या चिंतेचा विषय बनत असला तरीही या पार्श्वभूमीवर एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण बाहेर न पडता, घरातच बसून जर सरकार आणि पोलीस प्रशासनला सहकार्य केले तर कोरोनाबाधितांच्या या आकड्यात लवकरात लवकर घट झालेली पाहायला मिळेल.

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा – १२४

मुंबई – 52
पिंपरी चिंचवड – 12
पुणे – 19
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
सांगली – 9
अहमदनगर – 3
ठाणे – 4
सातारा – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – 1

Related posts

इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेलाही पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन

News Desk

मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा भाजपचा डाव आहे !

News Desk

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तीकांता दास

News Desk