HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार 

नवी दिल्ली | काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या पदाचा राजीमाना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. आज (२४ ऑगस्ट) काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काही जणांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावे अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाची CWC ची बैठक आज अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीत नवीन अध्यक्ष नियुक्तीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.

एकीकडे सोनिया गांधींनी जर पद सोडल तर पदभार कोणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लिहिलं आहे. “कम बॅक राहुलजी”, फक्त काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला तुमची गरज असल्याचं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनीही राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना चाचणीसाठी आता सर्वात स्वस्त टेस्टिंग किट बाजारात उपलब्ध!

News Desk

बाबरी मशीद विध्वंस हा रचलेला कट की कारसेवकांचा राग ? आज लागणार निकाल

News Desk

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk