HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी देणारा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘किल नरेंद्र मोदी’ असा तीन शब्दांचा हा मेल आहे. गृह मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांसाठी असलेल्या विशेष सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. ८ ऑगस्टला हा मेल आला असून, यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, ‘एनआयए’ने या मेलच्या पडताळणीसाठी कुठलीही प्राथमिक चौकशी केलेली नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीला आली आहे.

‘एनआयए’ला एका ई-मेल आयडीवरून काही उच्चपदस्थ, मान्यवर तसेच यंत्रणा प्रमुखांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. मेलमधील मजकुराची प्रत सोबत जोडलेली आहे आणि संबंधित यंत्रणांनी योग्य ती कारवाई यासंदर्भात करावी, असे पत्र स्वत: तपास यंत्रणा असलेल्या ‘एनआयए’ने पुढे रवाना केले होते. दरम्यान, चौकशीसाठी तपास यंत्रणांचे समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्यात रॉ, आयबी, सुरक्षा, गुप्तचर यंत्रणांसह ‘एनआयए’ला सहभागी करून घेण्यात आले आहे. ई-मेलमागील घटक हे देशाबाहेरील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्टीफिशिअल इंटेलिजन्समध्ये भारताने भरीव कामगिरी करावी – पंतप्रधान

News Desk

गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर भाजपला धक्का

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk