HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे १६७ जणांचा मृत्यू

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसाने येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. लाखोच्या संख्येने नागरिक बेघर झाले आहेत. एनडीआरएफच्या पाटी टीम तिरुअनंतपुरमध्ये दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बस आणि रेल्वे फटका बसला आहे. पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आवाहन

केरळमधील पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तिन्ही सेनादल प्रमुखांची पत्रकार परिषद सायंकाळी ७ वाजता होणार

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह दोन जण दोषी, तर दोघांची सुटका

News Desk

देशात लस उपलब्ध होताच सगळ्यांना दिली जाणार – पंतप्रधान

News Desk
मुंबई

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk

मुंबई | लोअर परळचा रेल्वे पुलाच्या पाहणीवरून शिवसेना-मनसे कार्यकर्त्ये आमने-सामने आले. दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे कार्यकर्ते आले होते. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी त्यांच्या कार्यकर्ते दाखल झाले.

या पाहाणी दरम्यान मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने लावला आहे. हा पूल २४ जुलैपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. हा वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालवण्यासाठी बंद केला आहे. या पुलाच्या पाहणीवरून शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी वेळीस मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले.

गेले दोन दिवस लोअर परळ स्टेशनजवळील पुलाच्या दुरुस्तीबाबत बंद करण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहे. कोणताही पूर्वसूचना व पर्यायी नियोजन न करता हा पूल बंद केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.

Related posts

ठाण्यात सॅटिक पुलावर दोन बसची धडक

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा

News Desk