HW Marathi
देश / विदेश

राम रहीमच्या खटल्यावर आज निर्णय, पंजाबमध्ये अलर्ट जारी

हरियाणा | हरियाणातील पंचकूला येथील सीबीआयचे विशेष न्यायालयाकडून राम रहीम याच्याशी संबंधित पत्रकार छत्रपती हत्याकांडाप्रकरणी शुक्रवारी (११ जानेवारी) निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळे पंजाब तसेच हरियाणात कडक सुरक्षा बंदोबस्तासह अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रामुख्याने सुनारिया, सिरसा येथील डेरा डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आणि पंचकूला येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

पंचकूला येथील विशेष न्यायालयात आरोपी गुरमीत राम रहीम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर या प्रकरणातील अन्य आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहेत. राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात बलात्कार प्रकरणी २० वर्षाची शिक्षा भोगत आहे.

Related posts

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk

शहिद जवानांच्या मृतदेहाची विटंबना

News Desk

हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या | राहुल गांधी

News Desk