HW Marathi
देश / विदेश राजकारण

#DelhiAssemblyElections : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील या नेत्यांची नावे सामील

delhi assembly election

नवी दिल्ली | दिल्ली निवडणुकीची तारीख अगदी तोंडावर आल्यानंतर लक्ष लागून राहीले आहे ते म्हणजे निवडणुकीत उमेदवारी अर्ज कोणी कोणी भरले आहेत त्याची. आणि त्यानंतर महत्त्वाचे आहे ते म्हणजे निवडणुकीची प्रचारसभा कशी असणार आहे किंवा त्याचे नेमके नियोजन कसे असणार आहे. तत्तपुर्वी जाणून घेऊयात उमेदवारीच्या योदीत कोणी कोणी बाजी मारली आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने एकूण ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली असून त्यातील २ नावे ही महाराष्ट्रातील नेत्यांची आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर ही होन महत्त्वपुर्ण नावे या यादीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, भाजपाचा महत्त्वाचा सहकारी शिरोमणी अकाली दलानंतर आज (२२ जानेवारी) हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जननायक जनता पार्टी यांनीही दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेजेपी सहभागी होणार नाही असे चौटाला यांनी स्पष्ट केले असून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी २४ तासांत भाजपाला हे दोन धक्के बसले आहेत.

दरम्यान उमेदवारांची आणि स्टार प्रचारकांची यादी पाहता नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे यात शंका नाही. या मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत असून काँग्रेसच्या पार्टीतून रोमेश सभरवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने आपल्या मतदारसंघातून पेशाने वकील असणाऱ्या सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. आता दिल्लीत होणाऱ्या या निवडणूकीचा निकाल नक्की काय लागेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts

पंतप्रधान मोदींचा आज 68 वा वाढदिवस

News Desk

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

News Desk

भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिला !

News Desk