HW News Marathi
देश / विदेश

देवतांचे फोटो नोटांवर छापण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो असलेल्या नोटा असाव्यात, अशी मागणी केली होती. यानंतर भारतीय चलनावर (Indian Currency) महापुरुषांचे फोटो छापण्याचे काही पर्याय लोकांनी सुचविले. यात भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी देखील उडीत घेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर या महापुरुषांच्या नोटेवर छापलेला ट्वीट केला आहे. या फोटोसह राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नोटेवर देखील या ट्वीटमध्ये आहे. याद्वारे राम कदमांनी नोटेवर महापुरुषांचे फोटो यावेत, ही मागणी ट्वीटद्वारे केली आहेत. राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी काही महापुरुषांचे फोटो नोटांवर असावे, अशी मागणी केली आहे.

 

राम कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी !”, असे म्हटले आहे. राम कदमांनी ट्वीटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर या महापुरुषसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याचे नोट ट्वीट केले आहे. यानंतर राज्यातील माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नोटांवर असावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो 200 रुपयांच्या नोटेवर फोटो असल्याचे त्यांनी फोटो ट्वीट करत फोटो शेअर केला आहे. या ट्वीटला राणेंनी कॅप्शनमध्ये म्हटले, “ये परफेक्ट है”, असे म्हणाले. तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांच्या मागणीवर ट्वीट केली. केजरीवालांवर टीका करत पात्रा म्हणाले, “केजरीवालांची भूमिका म्हणजे सोंग आहे,” असे म्हणाले. तर दुसऱ्या बाजूल काँग्रेसने केजरीवाल यांची मागणी ही भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

केजरीवाल नेमके काय म्हणाले

 

केजरीवाल यांनी इंडोनेशियांचे उदाहरण देऊन मागणी करत म्हटले, “नवीन नोटांवर एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी, तर दुसऱ्या बाजूला भगवान गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापण्यात यावी.” केजरीवाल पुढे म्हणाले, “देव-देवतांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल. तर त्या अनेक वेगळ्या प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. मी पंतप्रधान यांना आवाहन करतोय, त्यांनी आपल्या चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मीचे चित्र छापावे.”

 

 

 

Related posts

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

News Desk

लवकरच लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

swarit