नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या समर्थनाचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी घरपूस समाचार घेतला आहे. केजरीवाल यांनी म्हटले की, पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. ज्यांनी पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करू दिला. तसेच पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असे म्हणात मोदींवर निशाणा साधला.
A Kejriwal, Delhi CM in Margao, Goa: They call themselves 'strong leaders & strong govt', there have been many weak govts in last 70 years too but no govt did what Modi ji did, he wrote to ISI & called them for investigation…can Pak get a better PM of India than this? (13.4.19) pic.twitter.com/Wwffo1x3xs
— ANI (@ANI) April 14, 2019
अरविंद केजरीवाल पुढे असे देखील म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या नक्की काय शिजतेय? हे काळत नाही. निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही दिवसांपूर्वी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेने चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इमरान खान यांच्या विधानाचा उल्लेख करत केजरीवाल यांनी मोदींवर शंका उपस्थित केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.