HW News Marathi
देश / विदेश

#DelhiResult : ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार !

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज (११ फेब्रुवारी) निकाल हाली आले आहे. यात दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना स्थान दिली आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहे. देशभरातून केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच, दिल्लीतील जनतेले मन की बात नव्हे तर जन की बात चालणार आहे असे दाखवत भाजपला नाकारले आहे असा टोलाही या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.

‘अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजित करु शकले नाही,’ असेही या पत्रात लिहिले आहे. पत्राच्या शेवटी दिल्लीकरांचे आणि अरविंद केजरीवालांचे महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मनापासून मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोलाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही – रामदास आठवले

News Desk

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही !

swarit