HW News Marathi
Covid-19

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुनिता केजरीवाल या होम क्वॉरंटाईन झाल्या आहेत.

 

दिल्लीतील कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना केजरीवाल स्वत: मैदानात उतरुन उपाययोजना करत होते. यांनी अनेक बैठकांसह दौरेही केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दिवसेंदिवस चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. तसेच, कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश जावडेकर यांनी मास्क घालण्याबाबत सांगितलं की…!

News Desk

देशात चिंताजनक स्थिती! २४ तासांत तब्बल १ लाख ५२ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रुग्ण

News Desk

कोरोना रुग्णांवर ‘बीसीजी लसी’ची चाचणी करण्यास परवानगी, पुण्यातील ससून रुग्णालयात होणार चाचणी

News Desk