HW News Marathi
देश / विदेश

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुखसह भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ने गौरविले

नवी दिल्ली | दिवंगत थोर समाजसेवक नानाजी देशमुख व दिवंगत प्रख्यात संगीतकार आणि गीतकार भूपेन हजारिका या दोघांना मरणोत्तर, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गुरुवारी (८ ऑगस्ट) सन्मानित करण्यात आले आहे. यात अनुकमे देशमुख ४६, हजारिका ४७ आणि मुखर्जी हे अनुक्रमे ४८ वे ‘भारतरत्न’ पद मिळविणार ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग व अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, लालकृष्ण अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती भवनाच्या आलिशान अशोक दालनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न सन्मानित करण्यात आले. रा नानाजी देशमुख यांच्या वतीने त्यांनी स्थापन केलेल्या चित्रकूट येथील दीनदयाळ शोध संस्थानचे अध्यक्ष वीरेंद्रजित सिंग यांनी, तर हजारिका यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव तेज यांनी ‘भारतरत्न’चा स्वीकार केला.

प्रणव मुखर्जी सन २०१२ ते २०१७ या काळात राष्ट्रपती असताना २०१५ या एकाच वर्षी ‘भारतरत्न’ जाहीर झाले होते व त्यावेळी मुखर्जी यांच्या हस्ते पं. मदनमोहन मालवीय व अटल बिहारी वाजपेयी यांचा गौरव करण्यात आला होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी व डॉ. व्ही. व्ही. गिरी यांच्यानंतरचे ‘भारतरत्न’ने सन्मानित होणारे प्रवण मुखर्जी हे देशाचे चौथे माजी राष्ट्रपती ठरले. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. झाकीर हुसैन व डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम या ‘भारतरत्न’च्या मानकऱ्यांनीही देशाचे राष्ट्रपतीपद भूषविले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनीत कौरचा धमाका, भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात

News Desk

मलिकार्जुन खरगेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक

Darrell Miranda

अटलजींना आहेत हे आजार…

News Desk