HW News Marathi
देश / विदेश

नवनीत कौरचा धमाका, भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात

टोकयो | नवनीत कौरने केलेल्या गोलच्या जीवावर भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान अद्याप कायम राहिलं आहे. भारत-आयर्लंड महिला हॉकीचा आजचा सामना हा भारतीय महिला संघासाठी ‘करो या मरो’ स्थितीचा होता. त्यामुळे आजचा सामना जिंकायचाच या इराद्याने प्रत्येक खेळाडू मैदानात उतरल्याचं दिसून आलं. खेळ रंगात आला असताना 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने एका पासवर अप्रतिमरित्या चेंडू जाळ्यात ढकलला आणि भारताने शेवटच्या क्षणी 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय महिला हॉकी संघाच्या आजच्या विजयामुळे संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान कायम असून पदकाच्या आशा अद्याप कायम आहेत.

60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजीतचा पराभव

लवलीनाच्या सामन्याआधी महिला बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजनगटात भारताला निराशा हाती लागली. भारताच्या सिमरनजीतचा पराभव झाल्यानं तिचं आव्हान संपुष्टात आलं. सिमरनजीतचा 5-0 अशा फरकानं हार पत्कारावी लागली. यासोबतच सिमरनजीतचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं.

 

भारताला धक्का, तिरंदाजीत दीपिका कुमारीचा क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव

टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये मेडल मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाली आहे. दीपिकाचा दक्षिण कोरियाची नेमबाज अन सनने (An San) दीपिकाचा 30-27, 26-24, 26-24 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दक्षिण कोरियाच्या अन सननं टोकोयो ऑलिम्पिकमध्ये 2 गोल्ड मेडल यापूर्वीच जिंकले आहेत.महिलांच्या सांघिक स्पर्धेत आणि मिक्स टीम इव्हेंटमध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याचबरोबर एक नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड देखील नोंदवला आहे. त्यामुळे दीपिकाला क्वार्टर फायनलमध्ये मोठे आव्हान होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#ITraidsHWNews | HW च्या ऑफिसवर Income Tax ची धाड

News Desk

भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानची पुन्हा घुसखोरी ?

News Desk

२०२० पासून बीएस-४ श्रेणीतील वाहनाची विक्री होणार नाही | सर्वोच्च न्यायालय

swarit