HW Marathi
देश / विदेश राजकारण

ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही !

मुंबई | मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी आज (११ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहेत, भाजप प्रवेशानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच ‘काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही’, असे म्हणत काँग्रेसवर टीका केली. शिंदे हे शुक्रवारी (१३ मार्च) भाजपकडून राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. राजकारण हे लोकसेवेचे माध्यम आहे. आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसवर टीका केली. ज्योतिरादित्य शिंदे ऐवढ्यावर थांबले नाही ते पुढे म्हणालेकी, मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची कामगिरी निराशाजनक,” असे म्हणत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर हल्लाबोल केला.

ज्योतिरादित्य शिंदेंनी काल (१० मार्च) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्वीट करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मध्य प्रदेशासह देशाचे राजकारण ढवळून निघाले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी राजीनामा दिला.  यानंतर मध्य प्रदेश सरकार आता अल्पमतात आल्याचे चित्र आहे.  शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. “विजयाराजे यांचा नातू भाजपमध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे. भाजपच्या प्रगतीमध्ये विजयाराजें यांचा मोठा हात आहेत,” असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ज्योतिरादित्य शिंदेच्या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेशानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय म्हणाले. 

“पंंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. या सर्वांनी मला भाजपमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, भाजप प्रवेशानंतर ज्योतिरादित्य शिंदे माध्यमांशी बोलताना सर्वांचे आभार मानले. मी भाजपमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे ही ज्योतिरादित्य शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाल  माझ्या आयुष्यात दोन तारखा महत्त्वाच्या आहेत. लोकांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाची वळण येतेत ज्यांनी लोकांचे आयुष्य बदलून जाते. पहिला दिवस ३० सप्टेंबर २००१ ज्या मी माझ्या वडिला गमविले आणि दुसरी तारीख १० मार्च ही माझ्या वडिलांची जयंती, या तारखेला मी माझ्या आयुष्याला वेगळेवळण देण्या निर्णय घेतला. राजकारण हे लोकसेवेचे माध्यम आहे. आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, असे म्हणत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसवर टीका केली. ज्योतिरादिच्य शिंदे ऐवढ्यावरच थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की,  मध्य प्रदेशाच्या काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याचे त्यांनी मध्यमांशी बोलताना म्हणाले. रोजगाराच्या संधी मिळाल्या नाही, भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हास्ते सुरक्षित आहेत.”

 

 

 

 

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

News Desk

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित केला दहशतवादाचा मुद्दा

News Desk

#CoronaVirus : ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास कायदेशीर कारवाई

अपर्णा गोतपागर