नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ ऑगस्ट) माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. मोदी हे फ्रान्समधील जी ७ परिषदेसाठी गेले असताना जेटली यांचे निधन झाले. तसेच मोदींनी जेटलींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
Delhi: Prime Minister Narendra Modi met the family of late former Union Finance Minister #ArunJaitley at his residence, today. pic.twitter.com/zIhsWPogyl
— ANI (@ANI) August 27, 2019
यावेळी जेटलींचे चिरंजीव रोहन यांनी मोदींशी फोनवरू संपर्क करत सांगितले की, “देशाच्या कामासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात, त्यामुळे दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याची घाई करू नका,” अशी विनंती देखील केली होती. मोदींनी बहारीनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना जेटलींच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते. शनिवार (२४ ऑगस्ट) अरुण जेटली यांचे दुपारी १२.०७ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (२५ ऑगस्ट) दुपारी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
#WATCH Prime Minister Narendra Modi arrives at the residence of late former Union Finance Minister #ArunJaitley to pay tributes to him and meet his family. #Delhi pic.twitter.com/DeZaxGz2Ke
— ANI (@ANI) August 27, 2019
जेटली राज्यसभेचे चार वेळा सदस्य होते. २००० साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जेटली कॅबिनेट मंत्री होते. २००९ ते २०१४ या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. मोदी सरकारमध्ये त्यांनी अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार आणि संरक्षण तसेच माहिती तंत्रज्ञान विभागांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुरा सांभाळली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.