HW News Marathi
देश / विदेश

CDS बिपीन रावत यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल, अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. रावत आणि पत्न मधुलिका यांच्यावर आज (१० डिसेंबर) दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. रावत यांच्या निवासस्थानी जावून गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली.

भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये ९ डिसेंबरला कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले. रावत यांच्यासह १३ जाणांचे पार्थिव काल (९ डिसेंबर) दिल्लीच्या पालमपूम विमानतळावर आण्यात आले होते. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. मोदीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली.

बिपीन रावत यांचा अल्प परिचय

रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ साली झाला होता. रावत यांचे वडील देखील एलएस रावत सैन्यात होते. रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामधील सेंट एवडर्ड स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचे शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले. रावत यांना १९७८ मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झाले त्यांना ‘बेस्ट कॅडेट’ ठरले. तसेच रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले. रावत हे २०१६ मध्ये लष्करप्रमुख झाले होते. बिपीन रावत हे डिसेंबर २०१९मध्ये लष्करीसेवेतून निवृत्त होणार होणार होते. पण, सेवानिवृत्त होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती केली. बिपीन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान होणारे पहिले व्यक्त आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातच्या सचिवालय परिसरात बिबट्या शिरला

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण l आरोप निश्चितीला स्थगिती नाही – उच्च न्यायालय

News Desk

ईडीकडून नीरव मोदींची ६३७ कोटींची संपत्ती जप्त

swarit