नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहे. या कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत. वैद्यकीय कर्मचाऱ्यवरील हल्ल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी निषेध नोंदवा होता. या पाश्वभूमीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आणि प्रतिकात्मक विरोधही न करण्याचे आवाहन शहांनी डॉक्टरांना केले. सरकार कायम डॉक्टरांसोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Delhi: Union Home Minister Amit Shah interacted with doctors & Indian Medical Association (IMA) through video conferencing. He appreciated their good work. He also assured them security & appealed to them to not to do even symbolic protest as proposed by them, govt is with them. pic.twitter.com/Z88Woh8obr
— ANI (@ANI) April 22, 2020
शहांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यापूर्वी शहांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली. सध्या देशात कोरोनाचे १९ हजार ९८४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी १५ हजार ४७४ जणांवर उपचार सुरू असून ३ हजार ८७० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ६४० जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.