HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : अखेर चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, उद्या फासावर चढवणार

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींनी उद्या (२० मार्च) सकाळी ५.३० वाजता फासावर लठकविणार आहे. निर्भयाच्या दोषींच्या फाशींवर स्थगिती देण्याचा याचिका आज (१९ मार्च) पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे आता आता निर्भयाच्या पवन, अक्षय, मुकेश आणि विनय या चारही दोषींच्या सर्व पळवाटा संपल्या आहेत. निर्भयाचे चारही दोषींना फासावर लढकविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, दोषींचे वकील ए. पी. सिंह न्यायलयात सुनावणीदरम्यान म्हणाल की, दोषींना भारत-पाक सीमेवर पाठवा, डोकलामला पाठवा. मात्र निर्भयाच्या दोषींना फाशी देऊ नका. ते चारही दोषी देश सेवा करण्यास तयार असून यासंदर्भात मी शपथपत्र दाखल करू शकतो, असे ते न्यायालयात म्हणाले.

दरम्यान, मुकेशची याचिकावर बोलताना न्यायालय म्हटले की, “सर्व उपलब्ध मार्गांचा वापर केला आहे. आता या टप्प्यावर कोणत्याही पुराव्याचा विचार केला जाऊ शकत नाही,” असे म्हणाले. अक्षयची दया याचिका फेटाळल्यानंतर त्यांची पत्नी बेशुद्ध पडली, यामुळे या संपूर्ण प्रकार नाट्यमय असल्याचे बोले जाते. अक्षयच्या पत्नीने बिहार येथील कौटुंबिक न्यायालयता घटस्फोटसाठी अर्ज केला होता. मात्र, अक्षयची पत्नी घटस्फोटच्या सुनावणीला गैरहजर होती. त्यामुळे दोषींची फाशी टाळण्यासाठी केलेली असल्याची माहिती समोर आली आहे. निर्भयाच्या आरोपींनी एकापाठोपाठ एस अशा दया याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होता. मात्र, यानंतर चारही दोषींच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

यापूर्वी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या याचिकेत पवनने याचिकेत म्हटले की, घटनावेळी अल्पवयीन असल्याचा दावा त्यांनी केला होता. आणि फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करवे, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, सोमवारी (२ मार्च) याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाचे त्यांची क्युरेटिव्ही याचिका फेटाळली होती.

निर्भयाच्या दोषींची तीन वेळा जारी केले डेथ वॉरंट

निर्भया प्रकरणात यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. न्यायालयाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १ रुपयांचे पहिले दान

swarit

देशातील तरूण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो ! | नाना पटोले

News Desk

शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती

Aprna