नवी दिल्ली | “देशाचा चौकीदारच चोर निघाला”, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. राफेल डील खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेले वाद अद्याप शांत होण्याची चिन्हे दिसत आहे. राफेल डीलमध्ये दिवसेंदिवस नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल डीलमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या निवडीमध्ये फ्रान्सचा कोणताही हात नाही, अशा विधानामुळे फ्रान्समध्येचे नाही तर भारतात देखील खळबळ माजली. राफेल करारासाठी भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स नावाचा प्रस्ताव पाठवला होता, असा नवीन खुलासा ओलांद यांच्याकडून करण्यात आला आहे.
We're absolutely convinced that the Prime Minister of India is corrupt. This question is now clearly settled in the mind of the Indian people that 'desh ka chowkidaar' chor hai: Congress President Rahul Gandhi on #RafaelDeal pic.twitter.com/eQaqB50z6M
— ANI (@ANI) September 22, 2018
तसेच अनिल अंबानी यांच्या कंपनीला एकही विमान बनविण्याचा अनुभव नाही. तर एचएएलला विमान बनविण्याचा ७० वर्षाचा अनुभव आहे. ओलांद यांनी देशाचा आणि अंबानींच्या कंपनीच्या निवडण्यात कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच मोदींनी भारतीय जवानांच्या आयुष्य, देशाच्या सुरक्षेचा आणि भ्रष्ट्राचाराचा हा प्रश्न आहे. मोदी सरकारने राफेल डीलवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
मोदींनी त्यांचे मित्र बिजनेस मॅन अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींची भेट दिल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. मोदी यांची आपण मदतच करणार असून फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचे सर्व आरोप खोटे आहे. मोदींनी यांनी राफेल डीलचे सत्य देशासमोर सांगावे. माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राफेल डील जेव्हा बदल झाले होते. तेव्हा त्यांना राफेल डील बदल काही माहित नव्हते. मग पर्रिकरांना फक्त गोव्यातील मांसळी बाजारातील बाजार खरेदी करणे ऐवढच माहिती आहे. अशा शब्दात राहुल यांनी पर्रिकरांवर टीका केली.
#WATCH: Congress President Rahul Gandhi says on #RafaleDeal, "the former Defence Minister (Manohar Parrikar) said that when the contract was changed, he didn't know about it. He was buying fish in the markets of Goa" pic.twitter.com/1y3t3Dx7jX
— ANI (@ANI) September 22, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.