HW News Marathi
देश / विदेश

“देश का चौकीदार चोरी कर गया मोदी जी” | राहुल गांधी

अमेठी | राफेल डीलवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गाधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा तोफ डागली. “मोदी जी ने कहा था कि वो प्रधानमंत्री नहीं देश के चौकीदार बनना चाहते हैं, देश का चौकीदार (पीएम मोदी) चोरी कर गया मोदी जी, फ्रान्स जाते है और कहते हैं, कि अनिल अंबानी को कांट्रैक्ट देना है, देश समझना चाहता है, कि देश के चौकीदार ने क्या किया?” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

याआधी राजस्थामध्ये आयोजित केलेल्या सभेत राहुल यांनी मोदींना ‘चोर’ म्हटले होता. तेव्हा राहुल गांधी यांनी म्हटले होती की, मी या देशाचा पंतप्रधान नाही, तर मी या देशाचा चौकीदार आहे. राहुल यांनी मोदींच्या या वाक्याचा संदर्भ देत ‘गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है‘, अशा शब्दात मोदींची खिल्ली उडवत त्यांच्यावर चोरीचा आरोप केला. तसेच देशातील नागरिकांच्या हृदयातून आज एकच आवाज बाहेर येत आहे. ‘गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है’, हाच तो देशातील नागरिकांचा आवाज असल्याचे राहुल यांनी म्हटले.

 

 

राहुल गांधी सध्या दोन दिवसीय अमेठी दौऱ्यावर आहेत. अमेठीत दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी येथील शिवमंदिराला भेट देऊन पुजा-अर्चना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होळीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी धरला ठेका …

News Desk

आम्हाला शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांची मागणी

News Desk

‘फनी’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर धडकले, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

News Desk