HW News Marathi
देश / विदेश

फडणवीसांनी घेतली मोदी-शहांची भेट, राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा?

नवी दिल्ली | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (१७ मार्च) रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्याआधी गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळानेसाखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात ही भेट घेतली होती.

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील ही भेट राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींची नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती दिली असावी. राज्यात यापुढे काय पावलं उचलावी, या राजकीय स्थितीचा फायदा घेता येईल का? याचीही चर्चा झाली असल्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चा सध्या या भेटीनंतर सुरु झाल्या आहेत.

काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, सचिन वाझे प्रकरणावर सरकारवर सडकून टीका केली. मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिला, असा दावाही त्यांनी काल केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या ९ कार ईडीकडून जप्त

News Desk

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

ईडीकडून नीरव मोदींची ६३७ कोटींची संपत्ती जप्त

swarit