श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले आहे. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. बडगाम जिल्ह्यातील कलान गावात भारतीय वायू दलाचे मिग-२१ हे लढाऊ कोसळले असून या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायु दलाने पाकिस्तानी वायु दलाचे एफ-१६ हे विमान पाडले ही माहिती पीटीआय या वृत्त संस्थेने दिली आहे. परंतु “या विमानाशी आमचा काही संबंध नसल्याची माहिती”, पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे.
DG ISPR, Pakistan, Maj Gen Asif Ghafoor: There are reports of crash of an Indian aircraft on the Indian side (in Budgam), we had no engagement with that aircraft. pic.twitter.com/pWDYwVfoFR
— ANI (@ANI) February 27, 2019
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने राजौरा जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत हवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या विमानावर हल्ला चढवत एक विमान नष्ट केले आहे. तर, उर्वरीत दोन विमानांनी आपल्या हद्दीत परतताना भारतीय हद्दीत काही बॉम्बही टाकल्याची माहिती पीटीया वृत्त संस्थेने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.