HW News Marathi
देश / विदेश

दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | बिहारमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी काल (४ ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत. काल त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे.

श्रेयसी सिंह यांची आई पुतुल सिंह खासदार होत्या. त्यांचे वडील दिग्विजय सिंह जॉर्ज फर्नांडीस यांचे सहकारी आणि जनता दलाचे नेते होते. काही काळाने ते समता पार्टीत गेले होते. दरम्यान काहीवेळा बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील त्यांनी केले होते. श्रेयसी सिंह यांनी भाजपचे महासचिव अरुण सिंह आणि बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयसी सिंह बिहारसभा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक 

News Desk

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

Gauri Tilekar

हिमाचल प्रदेशातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

News Desk