HW News Marathi
देश / विदेश

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन 

मुंबई | ‘द्रमुक’ चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी (मुथुवेल करूणानिधी ) यांचे प्रदिर्घ आजाराने निधन. तामिळनाडूच्या कावेरी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. प्रकृती किंचितशी खालावल्यामुळे चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. करुणानिधी हे ९४ वर्षाचे होते. वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना सांगितेले होते. करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त होते.

कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करुणानिधी यांचा जन्म ३ जून १९९४ रोजी तिरुक्कुवलई, मद्रास प्रैज़िडन्सी, ब्रिटिश भारतात झाला होता. करुणानिधींनी तमिळ चित्रपट उद्योग मध्ये पटकथालेखक म्हणून आपले करिअर सुरू केले. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि भाषण कौशल्यामुळे ते एक राजकारणी बनले. करुणानिधी द्रविड़ आंदोलनाशी संबंधित होते आणि त्यांनी आपल्या समाजवादी आणि बुद्धीवादी आदर्शांना प्रोत्साहन देणा-या ऐतिहासिक आणि सामाजिक (सुधारणावादी) कथा देखील लिहल्या. करुणानिधी यांनी तामिळ सिनेमा पराशक्तीच्या माध्यमातून आपल्या राजकीय मतांचा प्रचार करणे सुरु केले.

जस्टीस पार्टीच्या अलागिरीरस्वामी यांच्या भाषणाने प्रेरीत होऊन करुणानिधी यांनी वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले. त्यांनी आपल्या परिसरातील स्थानिक युवकांसाठी एक संस्था स्थापन केली. त्यांनी तामिळनाडु मध्ये तमिळ मनावर मंद्रम नावाची एक विद्यार्थी संघटना स्थापन केली. जी द्रविड आंदोलनाची पहिली विंग होती. करुणानिधी यांनी इतर सदस्यांसह, विद्यार्थी संघटनेसह स्वत:ला सामाजिक कार्यामध्ये झोकून दिले. येथे त्यांनी आपल्या सदस्यांसाठी एक वृत्तपत्र सुरू केले जे पुढे डीएमकेचे अधिकृत वृत्तपत्र मुरसोली म्हणून उदयास आले. कल्लकुडीतील हिंदी विरोधी आंदोलनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. हाच त्यांचा तामिळ राजकारणातील पाळेमुळे घट्ट करण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरला.

करुणानिधी प्रथम १९५७ मध्ये तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथलाई विधानसभेमधून तामिळनाडू विधानसभेवर निवडून आले. १९६१ मध्ये ते द्रमुकचे कोषाध्यक्ष बनले आणि १९६२ साली विधानसभेत ते विरोधी उपनेते झाले आणि १९६७ मध्ये द्रमुक सत्ता स्थापन झाल्यावर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. १९६९ मध्ये अण्णादुराईचा मृत्यू झाला तेव्हा करुणानिधी यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. तामिळनाडू राजकारणात त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी पक्ष व सरकारमध्ये अनेक पदांवर कार्य केले आहे. मे २००६ च्या निवडणुकीत, त्यांच्या आघाडीने जयललिता यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी १३ मे, २००६ रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. ते सध्या तामिळनाडू विधानसभेमधील चेन्नईच्या चेपौक मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते . तमिळनाडू विधानसभेत ते ११ वेळा निवडून गेले आणि आता समाप्त झालेल्या तमिळनाडू विधान परिषदेत एकदा निवडून आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईदनिमित्ताने भारताने देऊ केलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली

News Desk

महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

News Desk

रेल्वेगाड्यांना आता साहित्यकृतींची नावे!

News Desk