मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जित पटेल ५ सप्टेंबर २०१६ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. यापूर्वी ७ जानेवारी २०१३ पासून ते डेप्युटी गव्हर्नर होते. रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात नोटबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. उर्जित पटेल यांचा जन्म १९६३ मध्ये केनियात झाला. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं पुढील शिक्षण त्यांनी ऑक्सफर्ड आणि येल विद्यापीठातून घेतलं. जागतिक नाणेनिधी मंडळासाठी त्यांनी पाच वर्षं काम केलं. २०१३ साली त्यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली.
रघुराम राजन यांच्या आधीपासून त्यांनी आरबीआयच्या कामास सुरूवात केली होती. राजन आणि पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) एकत्रित काम केले आहे. राजन यांच्या निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. २८ सप्टेंबर १९६३ साली जन्मलेल्या पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केली आहे. बोस्टन कन्सलटिंग ग्रूपचे ते सल्लागार होते. आरबीआयच्या महत्वाच्या निर्णयात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे.
पीएचडी झाल्यानंतर पटेल यांनी १९९० साली आयएमएफमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते आरबीआयमध्ये सल्लागार म्हणून रूजू झाले. या काळात आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या निर्णयात मोलाची भूमिका निभावली. त्यानंतर केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी १९९८ ते २००१ या काळात काम पाहिले. २०१३ मध्ये त्यांची डेप्युटी गर्व्हनरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांच्यासमोर वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. राजन यांनी ज्याप्रमाणे आपल्या कामाचा ठसा भारतीय अर्थक्षेत्रात उमटवला होता. तशाच कामगिरीची पटेल यांच्याकडून अपेक्षा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.