HW News Marathi
देश / विदेश

देशाच्या अर्थसंकल्पाबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…

मुंबई | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून सुरू झाले आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी आज (31 जानेवारी) केलेल्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण (Nirmala Sitharaman) उद्या (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. दरम्यान सादर होणारा अर्थसंकल्प हा पुढील आर्थिक वर्षातील प्रमुख आर्थिक योजना असतात. या अर्थसंकल्पनात वेगवेगळ्या विकासकामांसाठी वेगवेगळ्या मंत्रालयांना निधी दिला जातो.

संसदेत उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंतु, अर्थसंकल्पासंदर्भात तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? तुम्हाला अर्थसंकल्पासंदर्भात काही माहिती नसेल तर आज तुम्हाला अर्थसंकल्पासंदर्भात काही गोष्टी माहिती सांगणार आहोत.  अर्थसंकल्पासंदर्भात रंजक माहितीची तुम्ही नक्की वाचा…

 

अर्थसंकल्पासंदर्भातील रंजक गोष्टी

  • देशाचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. तसेच षण्मुखम चेट्टींनी 1947 ते 1948 पर्यंत भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून काम पाहिले.
  • देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूण 73 सामान्य अर्थसंकल्प असून 14 अंतरिम अर्थसंकल्प आणि 4 विशेष किंवा मिनी बजेट सादर करण्यात आले आहेत.
  • देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या पंतप्रधानांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले आहेत.
  • अर्थसंकल्प संसदे सादर होण्यापूर्वी अर्थमंत्रालयात ‘हलवा सेरेमनी’ एक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमानंतर अर्थसंकल्पाची छपाई प्रक्रिया सुरु होते. या कार्यक्रमामध्ये एका पारंपारिक कढाईत हलवा तयार केला जातो आणि अर्थसंकल्प बनविण्यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो
  •  अर्थसंकल्प हा 2016 पूर्वी शेवटच्या आठवड्यात सादर केला जात होता. परंतु, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये ही परंपरा मोडून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
  • देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा लाल कपड्यात अर्थसंकल्प घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या. 2019 पूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्प वहीखाताच्या रूपात सुटकेमध्ये अर्थसंकल्प आणत होते. परंतु, सीतारामण यांनी ही प्रथा मोडली. यात अर्थसंकल्पाच्या फाईला वहीखाता म्हटले जाते
  • यंदाचा अर्थसंकल्प हा कागदविरहीत म्हणजे पेपरलेस स्वरुपात असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ वादग्रस्तवर दिले स्पष्टीकरण

swarit

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

News Desk

बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल !

News Desk