HW News Marathi
Covid-19

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण 

वॉशिंग्टन |अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्रम्प यांनी ट्विट करताना म्हटले आहे, “मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलो आहोत. आम्ही यामधून लवकरच बाहेर पडू”.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत आपण क्वारंटाइन होत असल्याचे सांगितले होते. अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 

https://twitter.com/realDonaldTrump/status/1311892190680014849?s=19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण

News Desk

…म्हणून महाराष्ट्रात लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत!,आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

News Desk

राज्यात आज ८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद  

News Desk